Blog

विनाकारण, विना सल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती साठी औषधी खाऊ नका

by in Ayurveda, Health Tips June 29, 2020

आयुर्वेद आणि व्याधिक्षमत्व

आजही कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने व्याधिक्षमत्व कींवा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद औषधांची मागणी वाढत आहे. दवाखान्यात येणारे रुग्ण पण प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषध देण्याचा आग्रह धरत आहेतच. आयुर्वेदात बहुतेक रोगप्रतिकारक औषधे ही स्वभावता उष्ण आहेत त्यामुळे ती विना सल्ल्याने खाल्ल्याने विविध आजार उत्पन्न होवू शकतात (e.g Gastritis). आयुर्वेद  औषधे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडतातच पण केवळ आपल्या आहार विहारातील पथ्याद्वारे पण  चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण  करता येते. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजेच निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे  आणि आजार होऊ न देणे हे ब्रीद वाक्य असणा-या आयुर्वेदामध्ये औषधाचा विचार नंतर येतो पण त्या आधी  दिनचर्या ॠतूचर्या नियमित करणे, आहार आणि दैनंदिन नित्य कर्म या विषयीचे नियम पाळणे यास अनन्यसाधारण महत्व आहे. आणि हा उत्तम प्रतिकार शक्ती मिळविण्याचा अत्यंत सुलभ मार्ग ठरतो त्या नंतर आवश्यक्ते नुसार वैद्याच्या सल्ल्याने आयुर्वेदातील रसायन औषधांचा वापर निश्चितच करता येतो.

आयुर्वेदानुसार रोगप्रतिकरक शक्ती म्हणजे काय?

आजार होण्याच्या परिस्थितीत  आजाराच्या विरोधात शरीराकडून केला जाणारा प्रतिकार. हा प्रतिकार जेवढा अधिक तेवढा आजार होण्याची शक्यता कमी. हा प्रतिकार शरीरातील दोष ( वात, पित्त, कफ), धातु ( रस रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) आणि मल( स्वेद , मूत्र, पुरीष) यांच्या  प्राकृतेवर (साम्यतेवर) अवलंबून असतो. आयुर्वेदात सांगितलेली पथ्ये ही या तीन घटकांची समता प्रस्थापित करतात आणि प्रतिकार शक्ती वाढवतात. औषधांविषयी ब-याच प्रमाणात जनमानसात जनजागृती असते पण आहार विहाराच्या नियमा विषयी तेवढी माहिती नसते त्या साठी हा लेखन प्रपंच..

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे सोपे  उपाय कोणते?

 

 • सकाळी लवकर उठावे या मुळे पोट साफ होण्याच्या क्रियेत अडथळा उत्पन्न होत नाही व हलकेपणा येतो.

 

 • हळद, सैंधव,त्रिफळाच्या कोमट पाण्यातून  गुळण्या करणे.

 

 • योगासने , चालणे, प्राणायाम ध्यान करावे त्या योगे शारीरीक व मानसिक स्वास्थ्य मिळते. सध्या पावसाळ्याच्या काळात अति व्यायाम टाळावेत.

 

 • अणु तैल / पंचेद्रिय वर्धन तेलाचे शमन नस्य करावे ( 2 थेंब) नस्य करणे व्यवहारीक दृष्ट्या शक्य नसल्यास   कोमट  गाईचे तूप अथवा तेल बोटाने नाकास आतून लावावे.

 

 • स्नान करण्यापूर्वी अंगास कोमट तेलाने अभ्यंग करावा प्रतिकार शक्ती वाढीसाठी याचा सुंदर उपयोग होतो.

 

 • आपल्या भुकेनुसार पचण्यास हलका आणि ताजा असा आहार नियमित वेळेत घ्यावा.

 

 • थंड पेयं, दही लस्सी, लोणची,आंबट फळे सारखे पदार्थ सध्याच्या पावसाळ्यात खाणे टाळावे.

 

 • रात्री जेवणात जड पदार्थ ( मांसाहार, दुग्धजन्य पदार्थ, मैद्याचे पदार्थ पिष्टमय पदार्थ) घेणे टाळावे.रात्री जेवण लवकर करावे.

 

 • शक्यतो कोमट पाणी किंवा उकळून थंड केलेले पाणी घ्यावे. षडंगोदक पण घेऊ शकतो.रात्री झोपण्या पूर्वी कोमट पाणी प्यावे.

 

 • पावसाळ्यात दुपारी झोपणे कटाक्षाने टाळावे, पण रात्री जागरण न करता पुरेशी झोप घ्यावी.

 

 • पावसाळ्यात गार वा-यात फिरणे टाळावे.

 

 • पावसाळ्यात आहारात मधाचा वापर करावा.

 

 • पावटा वाटाणा हरभरा या सारख्या कडधान्याचा वापर टाळावा अथवा तैलात चांगल्या परतलेल्या असाव्यात.

 

 • रात्री झोपताना दूध हळद घेऊ नये. दूध हे अन्न पदार्थाच्या वेळा सोडून घ्यावे. दूध हळद घेताना आपल्याला योग्य  आहे का ?या संबंधी  आपल्या वैद्यांकडून सल्ला आवश्य  घ्यावा.

 

 • आयुष काढा, च्यवनप्राश या सारखी औषधे घेण्यापूर्वी वैद्याचा सल्ला आवश्य घ्यावा.

 

 • आहारात भेंडी भोपळा, दोडके, तांदुळसा मूग या  सारख्या भाज्या नेहमी पथ्यकारक ठरतात..तसेच पालक, चाकवत, कोबी शेपू, गवार, शेवगा, श्रावणी घेवडा, मेथी मटकी ह्या भाज्या पण पावसाळ्यात उपयोगी ठरतात पण वैद्याचा सल्ला घेऊनच खाव्यात.

 

(नोट:वरील आहार आणि विहार विषयी पथ्यांचा अवलंब करण्यापूर्वी  आपल्या वैद्याचा सल्ला आवश्य घ्यावा.)


About Dr. Nilesh Wagh
Dr. Nilesh Wagh MD (Ayurved)
25 Comments
 1. Very nice and important. In night I could not understand the reson to take the yellow milk. At present situation many consultant advising to take it.

  • खुप धन्यवाद!!
   आयुर्वेदात अध्यशन वर्ज्य सांगितलं आहे. म्हणजे जेवणानंतर लगेचच काही खाणे हे टाळावे. दुध हा जड व अभिषन्द द्रव आहार आहे. त्यामुळे तो रात्री जेवणानंतर लगेच घेतल्यास पचायला जड आहे.
   रात्री जेवणानंतर 3 तासानंतर बाल कींवा तरुण घेऊ शकतात. रात्री हळद कोमट पाण्यात जेष्ठ व्यक्तींना योग्य राहील. 🙏

  • It’s very important information sir ,Thank u sir

 2. Very nice sir, its really usefull👍

 3. It is always necessary to seek for doctor’s advice before taking any medication 👍 useful information to improve immunity without using medication 👌👌

 4. 👍

 5. RAJSHREE N. RAMTEKE June 29, 2020 at 8:15 am Reply

  Great …….good information…🙂🙂

 6. Nice information sir

 7. सद्य परिस्थितीत केवळ रोगप्रतिकार शक्ती वाढावी याकरिता कुठल्याही प्रकारचा पथ्य-अपथ्याचा विचार न करता विविध पदार्थांचे सेवन केले जात आहे.
  अशा परिस्थितीत आपण वर वर्णन केलेल्या उपायांचा नक्कीच उपयोग होईल….👌👍

 8. It’s very important information sir ,Thank u sir

 9. Thank you sir ,as u told all about what should be taken as mill and how to stay safe . Thank u sir .

 10. Very helpful content

 11. Really helpful article

 12. It is very informative and significant…..

 13. खुप छान आनि महत्वपूर्ण माहिती आहे सर….. Very informative👍👍👍……

 14. Nice article sir

 15. Nice article sir….👍

 16. Khupach chhan 👍

 17. Nice article

 18. आपण वर्णन केल्याप्रमाणे जर दिनचर्येचा अवलंब केला,तर आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन..
  “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् |
  आतुरस्य विकार प्रशमनं च ||”
  नक्की च साधल्या जाईल ..

 19. Very helpful

 20. आजकाल लोक स्वतः वैद्य झाले आहेत . आयुर्वेदिक औषधी चे साइड इफेक्टस नाहीत म्हणून कोणाच्या हि सल्याने व व्हाट्सअँप वर फॉरवर्ड केलेल्या पोस्ट पाहून औषधे घेतात . या गोष्टी मुळे उपाय सोडून अपाय अधिक होण्याची शक्यता असते . डॉ साहेबानी वरील माहिती अतिशय योग्य पद्धतीने दिली आहे . अशीच माहिती पुढे पण देत राहा . धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *