योग करतांना प्राणायाम कसा करावा
प्राणायाम
सद्या संपुर्ण जगभरात COVID 19 या प्राणवह संस्थेच्या साथीच्या रोगाने धुमाकुळ घातला आहे.
हा रोग जास्त पसरु नये म्हणुन सर्व देश खबरदारी घेत आहेत. असे आढळून आले आहे की, व्यक्तीची रोगप्रतिकरक शक्ती उत्तम असेल तर रोगाचा संसर्ग सहजासहजी होत नाही आणि संसर्ग झालाच तर ती व्यक्ती रोगाच्या गंभीर अवस्थेत जात नाही. म्हणजेच ती व्यक्ती लवकर बरी होते. आयुर्वेदात रोगप्रतिकरक शक्तीलाच व्याधिक्षमत्व असे म्हटले आहे.
आपल्या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुद्धा व्यधिक्षमत्व (Immune boosters) वाढविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
त्यापैकी योग व प्राणायाम आरोग्यासाठी खुपच लाभदायक आहेत. प्राणायाम हा योगाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे प्राणायामाचे योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
आता नेमका योग करतांना प्राणायाम कसा करायचा हा बहुतेक लोकांना प्रश्न पडला आहे.
कारण प्राणायामाचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी कोणते प्रकार हे सर्व सामान्यांच्या सहज लक्षात येईल आणि ते सोप्या पद्धतीने कसे करता येईल हे आज आपण बघूया.
सर्वप्रथम प्राणायाम म्हणजे काय-
तर शरीरातील प्राण शक्तीचे नियमन व नियंत्रण करणे.
(म्हणजेच श्वासोच्छ्वास प्रक्रीया व्यवस्थीत करणे)
प्राणायाम विधी-
सर्वप्रथम पद्मासन येत नसेल तर साधी मांडी घालून बसावे.
प्राणायामच्या प्रमुख तीन अवस्था आहेत.
- पूरक- बाहेरिल प्राणवायू नाकाद्वारे फुफ्फुसात घेणे.
- कुंभक- फुफ्फुसात प्राणवायु रोखून ठेवणे
- रेचक- उच्छवासाने वायू विशिष्ट गतीने बाहेर टाकणे.
ही सर्व प्रक्रिया करत असताना वेळचे विशिष्ट प्रमाण पाळणे आवश्यक आहे. (Time Ratio in second- 1:4:2)
उदाहरणार्थ-
पूरक- 4 सेकंद केला तर
कुंभक- 16 सेकंद करावा आणि
रेचक- 8 सेकंद असावा.
याचप्रमाणे आपण नाडीशुध्दि प्राणायाम सुद्धा करु शकतो.
नाडीशुद्धी प्राणायाम विधी-
उजव्या हाताच्या बोटाने(index finger) डावी नाकापुडी बंद करुन पुर्ण उच्छवास सोडावा. नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकापुडीने श्वास घ्यावा. अश्याप्रकारे 1:4:2 या मात्रेत पूरक, कुंभक व रेचक ही प्रक्रीया करावी. वेळेचे प्रमाण सरावानुसार वाढवावे.
प्राणायामाचे फायदे-
शरीर, मन आणि बुद्धी यांचे बळ वाढते.
अश्याप्रकारे सर्वांनी योग आणि प्राणायाम फक्त जागतिक योग दिवसापुरताच न करता रोजच स्वताच्या आरोग्यासाठी करावा ही नम्र विनंती.
डॉ. निलेश वाघ
एम. डी. आयुर्वेद (पुणे)